चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांची डॉ. अमोल कोल्हेंशी भेट

(Last Updated On: October 7, 2020)

पुणे : कलाकारांच्या प्रलंबित प्रश्नांना सोडविण्यासंदर्भात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी अभिनेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी महामंडळाचे मुखपत्र ‘चित्रशारदा’च्या व्यवस्थापकीय संपादिका अश्विनी धायगुडे कोळेकर उपस्थित होत्या.
कलाकारांच्या आरोग्य, आर्थिक मदत, पेन्शन, भविष्यातील योजनासंदर्भात सविस्तर चर्चा केली. खासदार अमोल कोल्हे यांनी कलाकारांचे प्रश्न पुढाकार घेऊन सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. ‘चित्रशारदा’चा खा. कोल्हे यांच्यावरील विशेष अंक त्यांना भेट देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *