आस
सारेच पांगले कसे
उघडी पडली नाती
विस्कटले जरी घरटे
सांधेल काडी काडी
त्यांची भाषा बघा
मला साथ देण्याची
शब्द फिरविती
जात बेगडी सरड्याची
असला वाळवंट रुजाया
शत अंकुर अंतरी
बहरे रूक्ष दिन सारे
वाहे छाया हिरवी
संघर्षवाटा भाळी
दाटे अंधार भोवती
श्वेत बाणा माझा
अजून दीपज्योत बाकी
संजय मुंदलकर
नागपूर