महिलांच्या तक्रारींबाबत सामाजिक उत्तरदायित्व मोहीम राबवावी

(Last Updated On: October 8, 2020)

मुंबई : संपूर्ण जगामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सायबर क्राईममध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असल्याचे निदर्शनास येत आहे. यात अनेक तरुण मुले आणि मुली गुंतत टोकाच्या भूमिका ही घेत आहेत. महिला आणि बालकांसंदर्भातील सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींबाबत सामाजिक उत्तरदायित्व मोहीम राबवावी, असे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोºहे यांनी केले आहे.
सायबर गुन्ह्यातील महिला सुरक्षेबाबत तसेच राज्यातील बेपत्ता झालेल्या महिलांच्या प्रश्नासंदर्भात आणि रेल्वे प्रवाशांमधील महिलांच्या सुरक्षेबाबत राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्याबरोबर वेबिनारचे आयोजन करण्यात आले.
उपसभापती डॉ. गोºहे म्हणाल्या, की पोलिसांना सूचना देताना ई-मेलद्वारेही तक्रारी केल्या तर त्याबाबत तत्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू करावा. विवाह संकेतस्थळावरील खोटी माहिती देऊन मुलींना फसविणे, लैगिक अत्याचार करणे तसेच लहान मुले-मुलींवर लैंगिक अत्याचाराची संख्या वाढलेली आहे. लहानमुलांवर होणारे संस्कार महत्वाचे असल्याने त्यांना सायबर क्राईमबाबत आवश्यक प्रशिक्षण देणेबाबत प्रयत्न करावेत. यात अनेक सामाजिक संघटना काम करतात. त्यांना प्रशिक्षणामध्ये समाविष्ट करत सर्व पालकांना प्रशिक्षण द्यावे. 14 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर याकाळात सायबर सुरक्षा व महिला हिंसाचारविरोधी प्रशिक्षण सप्ताह सुरू करावा, असेही निर्देश त्यांनी दिले.
चर्चेमध्ये अतिरिक्त पोलिस महासंचालक राजेंद्र सिंग, यशस्वी यादव विशेष पोलीस महानिरीक्षक (सायबर गुन्हे), श्री. बैजल उपमहानिरीक्षक (सायबर गुन्हे) यांनी भाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *