‘दिशा’ कायदा आगामी अधिवेशनात संमत करणार

(Last Updated On: October 8, 2020)

मुंबई : राज्यातील माता भगिनींसाठी सुरक्षेचे मोठे कवच निर्माण करणारा ‘दिशा’ कायदा येत्या अधिवेशनात संमत करून घेणार, अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित ‘दिशा’ कायदा अंमलबजावणी तसेच महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रतिबंध करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
गृहराज्यमंत्री द्वय सतेज पाटील व शंभूराज देसाई, खा. सुप्रिया सुळे,आ. यामिनी जाधव, आ. डॉ. मनिषा कायंदे, माजी आमदार विद्या चव्हाण, अति. पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) राजेंद्र सिंह, अति. पोलिस महासंचालक (सीआयडी) अतुलचंद्र कुलकर्णी आदी अधिकारी उपस्थित होते.
माता भगिनींसाठी मोठे सुरक्षा कवच निर्माण करण्यात येत असून यासंदर्भातील मसूदा अंतिम झाला आहे. याबाबत महिलावर्ग तसेच तज्ज्ञांकडून अधिक सूचना मागवून त्याचा अंतर्भाव करण्याबाबतची कार्यवाही तातडीने पूर्ण करून हा कायदा येत्या अधिवेशनात संमत करून घेतला जाईल. या बैठकीत सर्व प्रकारच्या चांगल्या सूचना आलेल्या आहेत त्याची नोंद घेवून हा कायदा अधिक चांगल्या पद्धतीने कसा करता येईल याचा विचार शासन करत आहे असे गृहमंत्र्यांनी सांगितले.
स्काईपद्वारे सहभाग नोंदवत विधान परिषद उपसभापती श्रीमती नीलम गोºहे तसेच चारूलता टोकस यांनी आपल्या सूचना मांडल्या. उपस्थित महिला प्रतिनिधीनींही सहभाग घेवून महत्त्वाच्या बाबी अधोरेखित केल्या. त्यात प्रामुख्याने महिला पोलिसांची संख्या वाढविणे, महिलांविषयक कायदे व सुविधा यांची अधिकाधिक प्रसिद्धी करणे, महिला आयोग अध्यक्ष व इतर सदस्यांच्या नियुक्त्या करणे, सोशल मीडियासंदर्भात अधिक जागरूकता, पोस्को केसेसचा निकाल, सायबर सेफ वूमन, महिलांसाठी विशेष न्यायालयाची निर्मिती करणे, दक्षता कमिटी, बीट मार्शल पद्धती, महिलांचे सेप्टी आॅडिट, गुन्हेगारांचा शिक्षा होण्याचा दर वाढवणे, महिलांसाठी कायदेविषयक माहिती केंद्र, महिलांसाठी सूचना, पत्रबॉक्स ठेवणे, महाविद्यालयात महिला पोलिस पथक, महिला पोलिस पाटील, सरपंच व स्थानिक पोलीस पथक यांची समिती, शस्त्रास्त्र प्रदर्शन, लॉकडाऊन काळातील गुन्हे आदी मुद्यांचा समावेश होता.
बैठकीत नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालावर राज्यातील गुन्हासंदर्भात संगणकीय सादरीकरण तसेच महिलांविषयक गुन्हे रोखण्यासाठीच्या उपाययोजना, नाशिक पोलिस आयुक्तालयाने केलेल्या विशेष उपाययोजना याचे सादरीकरण अनुक्रमे राजेंद्र्र सिंह, सुहास वारके व विश्वास नांगरे-पाटील यांनी केले.
बैठकीस वरिष्ठ पोलिस अधिकारी मिलींद भारंबे, रंजन कुमार शर्मा, एन. अंबिका, डी.के. नलावडे, गृह विभाग उपसचिव व्ही. एम. भट, मविमच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, रुपाली चाकणकर, नीला लिमये, शिल्पा सोनुने, राखी जाधव, उत्कर्षा रुपवते, सुदर्शता कौशिक, सुक्षणा सलगर, अदिती नलावडे, राज्यातील विविध पक्षांच्या महिला पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *