Home राजधानी मुंबई उपमुख्यमंत्री हुश्श! कथित घोटाळ्याप्रकरणी ‘क्लीन चिट’

उपमुख्यमंत्री हुश्श! कथित घोटाळ्याप्रकरणी ‘क्लीन चिट’

49

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महाराष्ट्र राज्य सरकार बँकेतील 25 हजार कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ‘क्लीन चिट’ मिळाली आहे. मुंबई पोलिसांनी सत्र न्यायालयात या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सादर केला होता.
माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील 25 हजार कोटी रुपयांच्या कथितघोटाळ्यात अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक नेत्यांची नावे होती. चौकशी अहवालात तत्कालिन संचालक मंडळावरच ठपका ठेवला होता. तसेच, भारतीय रिझर्व्ह बँकेने 2011 मध्ये तत्कालिन संचालक मंडळ बरखास्त केले होते. संचालक मंडळाने नियमांचे उल्लंघन केल्याने बँकेला मोठा आर्थिक फटका बसला होता. दरम्यान, या रिपोर्टला अंमलबजावणी संचालनालयाने विरोध केला आहे. एबीपी माझाने यासंबंधी वृत्त प्रकाशित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here