मुंबई : आमची सत्ता असताना मराठ्यांना आरक्षण देताना इतर मागासवर्गीयांच्याही हिताचेही रक्षण केले. मात्र, हे सरकार इतर मागासवर्गीय आणि मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
ते आज मुंबईत भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते.
कोरोना संकट हाताळण्याच्या राज्य सरकारच्या पद्धतीवर फडणवीस यांनी टीका केली. याकाळात भाजपाचा एकही कार्यकर्ता घरी बसला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले, की भाजपा हा मानवतावादावर आधारित आणि अंत्योयदयासाठी कार्यरत असलेला पक्ष आहे. सध्याचे केंद्र सरकार चांगली वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे हे सरकार सशक्त म्हणून ओळखल जात. कोरोनाच्या संकट काळातही सरकारने महत्वाचे आणि कठोर निर्णय घेतले. त्यामुळे देशभरात आरोग्यासाठीच्या पायाभूत सुविधा वाढवता आल्या, असे त्यांनी स्पष्ट केले.