कोरोनाशी लढण्यासाठी सेवाभावी संस्थांचे योगदान महत्त्वपूर्ण

(Last Updated On: October 10, 2020)

नागपूर : कोरोनाशी लढा देण्यासाठी शासन व प्रशासनासोबत सेवाभावी संस्थांचे उल्लेखनिय योगदान लाभले आहे. ज्ञानदीप या संस्थेतर्फे देण्यात आलेली आॅक्सिजन मशीन तसेच व्हेंटिलेटर आदी साहित्य कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त ठरणार आहे. कोरोनावर मात करण्यासाठी प्रभावी व परिणामकारक उपाययोजनांमुळे मृत्यू व रुग्णवाढीचा दर नियंत्रणात असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात ‘ज्ञानदीप’द्वारे आठ आॅक्सिजन यंत्र तसेच व्हेंटिलेटर कन्व्हर्टर यंत्र, कॉन्ट्रॅक्टर अँड बिल्डर असोसिएशनच्या वतीने कोविड रुग्णांसाठी नि:शुल्क दोन रुग्णवाहिका पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते देण्यात आल्या. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण बी., जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य कार्यपालन अधिकारी योगश कुंभेजकर, विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जी. ओ. शेख, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण महाजन, ज्ञानदीप संस्थेचे प्रभाकर वर्धने, बीसीके नायर, मोरेश्वर ढोबळे, बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सावजी आदी पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
कोरोनाबाधितांसाठी आवश्यक असलेले पॅन आॅक्सिजन मशीन व इलेक्ट्रॉनिक व्हेंटिलेटर कन्व्हर्टर ज्ञानदीप संस्थेतर्फे ग्रामीण, अतिदुर्गम भागातील आरोग्य सेवा पुरविणाºया संस्था तसेच महानगरपालिका व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात हेमलकसा येथील डॉ. प्रकाश आमटे यांचे आरोग्य केंद्र, मेळघाटातील महान या आरोग्य सुविधा पुरविणाºया संस्थेत त्यासोबतच स्वामी विवेकानंद हॉस्पिटल, मातृसेवा संघ, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर महानगरपालिका, दंदे फाऊंडेशन या संस्थांना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *