Home राजधानी मुंबई ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे निधन

49

मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे गुरुवारी निधन झाले आहे.
मराठी चित्रपटक्षेत्रात विनोदी अभिनेता म्हणून अविनाश खर्शीकर यांची कारकीर्द गाजली. आपल्या सहज आणि निखळ अभिनयामुळे नव्वदच्या दशकातील चाहता कलाकार म्हणून ते परिचित होते. सन 1978 मध्ये ‘बंदिवान मी या संसारी’ चित्रपटाद्वारे कारकिर्दीला सुरुवात केली. तुझे आहे तुजपाशी,वासूची सासू, झोपी गेलेला जागा झाला, सौजन्याची ऐशी तैशी, लफडा सदन, अपराध मीच केला ही नाटके विशेष गाजली. याशिवाय आधार, आई थोर तुझे उपकार, घायाळ, लपवाछपवी, माफीचा साक्षीदार आदी चित्रपटांच्या माध्यमातून अभिनयाचा ठसा त्यांनी रसिकांच्या मनावर उमटविला. आपण मराठी चित्रपटसृष्टीतील लाडका विनोदी कलाकार गमावला आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here