Home राजधानी मुंबई निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ सकारात्मक

निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ सकारात्मक

44

मुंबई : राज्यातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात लवकरच वाढ करण्यासंदर्भात शासन सकारात्मक असल्याचे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले. त्यामुळे शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
राज्यात मुंबई, नागपूर, नांदेड आणि उस्मानाबाद अशी चार शासकीय आयुर्वेद महाविद्यालये असून यातील पदव्युत्तर विद्यार्थी निवासी योजनेंतर्गत सेवा बजावत आहेत. राज्यातील शासकीय वैद्यकीय, दंत आणि आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर निवासी डॉक्टरांना विद्यावेतन दिले जाते. तसेच त्यात दर तीन वर्षांनी वाढ करण्यासंबंधी आढावा घेण्यात येतो. मात्र मे 2020 मध्ये आयुर्वेद वगळता केवळ शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयातील पदव्युत्तर निवासी डॉक्टरांना रुपये 10 हजार एवढे विद्यावेतन दिल्याने, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना प्रतिमाह रुपये 5 हजार विद्यावेतनात काम करावे लागत होते. त्यामुळे त्यांच्या विद्यावेतनासंदर्भात प्रश्न निर्माण झाला होता.
याबाबत डॉक्टरांनी आपले गाºहाणे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री यड्रावकर यांच्याकडे मांडले होते. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या समन्वयातून निवासी हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, असे राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here