Home प्रादेशिक विदर्भ महिलानिर्मित सौर पॅनलला प्राधान्य हवे : सुनील केदार

महिलानिर्मित सौर पॅनलला प्राधान्य हवे : सुनील केदार

79

वर्धा : तेजस्वी सोलर एनर्जी मागासवर्गीय महिला औद्योगिक को -आॅपरेटिव्ह सोसायटी ही राज्यातील महिलांद्वारे सौर पॅनल निर्मिती करणारी एकमेव को-आॅपरेटिव्ह सोसायटी आहे. महिलांद्वारे चालविल्या जाणाºया अशा प्रकारच्या तांत्रिक उद्योगाला चालना देण्यासाठी आणि रोजगार उपलब्ध होण्यासाठी त्यांच्या उत्पादनाची ‘मेडा’अंतर्गत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून अपारंपरिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पात सहभागी करून घेण्याचे निर्देश पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याणमंत्री तसेच पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले आहेत.
वर्धा जिल्ह्यात देवळी तालुक्यातील कवठा झोपडी या गावातील मागासवर्गीय महिलांद्वारे सोलर पॅनल निर्मिती केली जाते. उमेदच्या महिला बचतगटांनी एकत्र येऊन 2018 मध्ये को-आॅपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली. तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आयआयटी मुंबईच्या माध्यमातून महिलांना तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून देऊन या उद्योगाला जिल्हा वार्षिक योजनेमधून निधी सुद्धा दिला होता. महिलांनी राजस्थानातील डुंगरपूरच्या दुर्गा सोलर एनर्जी कंपनीमध्ये प्रशिक्षण घेतले. या उद्योगात 214 महिलांचा समभाग असून यातील 40 महिला सोलर पॅनल निर्मिती करण्यात तरबेज झाल्या आहेत. अन्य महिला पॅनलची उभारणी, मार्केटिंग आणि लेखा विभागाचे कामकाज सांभाळतात. या सर्व महिला तांत्रिकदृष्ट्या एखाद्या अभियंत्याप्रमाणे काम करतात.
सोलर पॅनल व पथदिव्यांची ‘मेडा’अंतर्गत नोंदणी न झाल्यामुळे या महिला उद्योजकांना मोठे प्रकल्प मिळत नाही अशी बाब महिलांनी सांगितल्यावर पालकमंत्र्यानी त्यांच्या उत्पादनाची तत्काळ नोंदणी करण्याचे आदेश दिले़ तसेच, अपारंपारिक ऊर्जा निर्मितीअंतर्गत मोठ्या प्रकल्पामध्ये राज्यभरात महिला उद्योजकांना प्राधान्य देण्याचेही त्यांनी सांगितले. महिलांद्वारे सोलर पॅनल तयार होणाºया कारखान्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते येत्या हिवाळी अधिवेशात करण्याची हमी त्यांनी महिलांना दिली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here