Home प्रादेशिक विदर्भ …तर रुग्णालयाचा परवाना रद्द करा

…तर रुग्णालयाचा परवाना रद्द करा

73

भंडारा : कुण्या रुग्णालयाने कोरोनाबाधिताकडून अतिरिक्त आकारले असल्यास संबंधित रक्कम रुग्णास परत मिळवून द्यावेत. प्रसंगी रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. कोरोनाबाबत लोकांच्या मनात भीती असून प्रशासनाने ही भीती दूर करण्यासाठी जागृती मोहीम राबवावी, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
जिल्हा परिषद सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, उपवनसंरक्षक एस. बी. भलावी, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे व नाना पंचबुद्धे यावेळी उपस्थित होते.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या अहवालानुसार पुढील काही दिवस कोरोना रुग्णदर वाढता असणार आहे. मृत्यूसंख्या कमी करण्यासाठी आराखडा तयार करावा. तसेच, बेड उपलब्धतेची माहिती मिळण्यासंबंधी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करावेत़ लोकांचे प्राण वाचविणे महत्त्वाचे असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
खासगी रुग्णालयात अवाजवी देयक आकारल्या जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असून नागरिकांची लूट करणाºया रुग्णालय प्रशासनावर कठोर कारवाई करावी. देयकाची तपासणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, लेखाधिकारी यांच्या सोबत पोलिस अधिकारी यांचे तपासणी पथक तयार करावे.