Home राजधानी मुंबई अनाथ बालके, विमुक्त जाती जमातीच्या मुलांच्या प्रश्नांबाबत आढावा बैठक

अनाथ बालके, विमुक्त जाती जमातीच्या मुलांच्या प्रश्नांबाबत आढावा बैठक

63

मुंबई : सफाई कामगारांची मुले, अनाथ बालके, विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मुलांच्या प्रश्नासंदर्भात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोºहे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक पार पडली.
राज्यातील अनुसूचित जाती जमातींच्या विद्यार्थ्यांसाठीच्या आश्रमशाळा व वसतिगृह यांच्या दुरुस्ती व पुनर्विकासाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बी.डी.डी. चाळ, वरळी येथील मागासवर्गीय वसतिगृहासंदर्भात प्रस्ताव म्हाडाकडे दिला असल्याचे समाजकल्याण आयुक्तांनी सांगितले.
समाजकल्याण आयुक्त डॉ. नारनवरे यांनी समाजकल्याण विभागांतर्गत विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती आॅनलाईन करण्यात येणार असल्याचे सांगितले. ‘आफ्टर केअर होम’ची राज्यात सात ठिकाणी वसतिगृहे आहेत. त्यांच्या स्थितीबाबत अनाथ मुलांसाठी एक टक्का आरक्षण, या आरक्षणाबाबत अंमलबजावणीची सद्यस्थिती याबाबतही आढावा घेण्यात आला. सफाई कामगारांना व त्यांच्या कुटुंबासाठी, अनाथ बालके, भटक्या विमुक्त जाती जमातीतील कुटुंब यांच्यासाठी शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात करता येऊ शकते का याबाबत तात्काळ माहिती सादर करण्याच्या सूचना डॉ. गोºहे यांनी केली.
महानगरपालिका तसेच नगरपालिका यात कंत्राटी सफाई कामगार कुटुंबातील मुलांना देखील योजनांचा लाभ मिळण्यासाठी विभागाने निर्णय घेतला असल्याचे डॉ. नारनवरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here