Home राजधानी मुंबई भंडारा जिल्हा कोविडमुक्त करण्याचा संकल्प करा

भंडारा जिल्हा कोविडमुक्त करण्याचा संकल्प करा

72

भंडारा  : कोराना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात वाढत असून लक्षणं असोत किंवा नसोत प्रत्येक नागरिकांनी तपासणी करून घेणे आवश्यक आहे. गावागावात तपासण्या करून घेण्यासाठी सरपंच यांनी पुढाकार घ्यावा. आजार अंगावर न काढता काळजी घेतल्यास कोरोनाला आपण हरवू शकतो. लोकांचे जीव वाचवण्यासोबतच जिल्हा कोविडमुक्त करण्याचा संकल्प करा, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या वतीने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत त्यांनी आज सरपंचांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलिस अधीक्षक वसंत जाधव यांच्या प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी कार्यक्रमात सहभागी झाले होते.
ग्रामीण भागात कोरोना चाचण्या आवश्यक आहे. सरपंच यांनी यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत येणाºया स्वयंसेवकांना सहकार्य करावे. लक्षणे असूनही तपासणीला उशीर केला तर मृत्यू ओढवू शकतो, असे ते म्हणाले.