उमेद अभियानासंबंधी सरकारची मोठी घोषणा

(Last Updated On: October 12, 2020)

मुंबई : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तथा उमेद अभियानांतर्गत महिलांचे स्वयंसहाय्यता गट तसेच महिला सक्षमीकरणासाठी सध्या सुरू असलेल्या सर्व योजना केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असून त्या तशाच पूर्ववत राहणार आहेत. याबद्दल निर्माण करण्यात आलेले समज चुकीचे आहेत. महिलावर्गाने अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण जैन यांनी केले आहे. कार्यरत कोणत्याही कंत्राटी कर्मचाºयांना नोकरीवरुन कमी करण्यात येणार नाही वा वेतन सुद्धा कमी केले जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
उमेद अभियानांतर्गत 10 सप्टेंबर 2020 रोजी किंवा त्यानंतर करार संपलेल्या कंत्राटी कर्मचाºयांच्या सेवा बाह्यस्थ संस्थेमार्फत घेण्यात येणार आहेत. त्यामुळे त्या संपुष्टात येणार नाहीत. किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळणार असून सध्याच्या मानधनात कोणतीही कपात करण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
वित्त विभागाने ३० सप्टेंबर २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये बाह्ययंत्रणेकडून / आऊटसोर्सिंगद्वारे कामे करून घेण्याबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचना तसेच ग्रामविकास विभागामार्फत 26 आॅगस्ट 2020 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकान्वये अभियानांतर्गत कार्यरत सेवा बाह्यस्थ संस्थेमार्फत आऊट सोर्सिंग पद्धतीने घेणे आवश्यक आहे. यासाठी अभियानांतर्गत 10 सप्टेंबर 2020 रोजी किंवा त्यानंतर करार संपलेल्या कंत्राटींच्या सेवा सीएससी ई- गव्हर्नस सर्विसेस इंडिया लि., नवी दिल्ली या बाह्यस्थ संस्थेमार्फत घेण्यात येणार आहेत. यासाठी सीएससी संस्थेस कार्यादेश देण्यात आलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *