Home मुंबई लैंगिक अत्याचारासंबंधी चौकशी दोन महिन्यांत पूर्ण व्हावी

लैंगिक अत्याचारासंबंधी चौकशी दोन महिन्यांत पूर्ण व्हावी

34

दिल्ली : लैंगिक अत्याचाराची तक्रार मिळाल्यानंतर त्यासंबंधीची चौकशी दोन महिन्यांच्या आत पूर्ण करावी, असे निर्देश केंद्र सरकारने राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. याशिवाय गृह मंत्रालयाने महिलांविरोधातील गुन्ह्यांसंदर्भात नव्याने मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.
संबंधित सूचनांमध्ये नमूद नियमांचे पालन पोलिसांकडून झाले नाही, तर त्यांच्याविरोधात चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत. लैंगिक अत्याचारांच्या घटनांमधे आरोपीवर वेळेत कारवाई व्हायला हवी. त्यासाठी राज्य सरकारांसह आणि केंद्र्रशासित प्रदेशांनी विशेष यंत्रणा उभारून अशा गुन्ह्यांतील चौकशी आणि कारवाईच्या प्रगतीवर देखरेख ठेवावी असेही गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार महिलांविरोधातील कोणत्याही दखलपात्र गुन्ह्यात एफआयआर ( प्रथम माहिती अहवाल) दाखल करणे पोलिसांना बंधनकारक असेल. एखाद्या ठाण्याच्या हद्दीबाहेरच्या दखलपात्र गुन्ह्यांबद्दल माहिती मिळाली, तरी कायद्यानुसार संबंधित ठाण्याला एफआयआर दाखल करता येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here