ध्यानाद्वारे तणावातून मुक्तता… SAAY pasaadan

रानशिवार

संत राजिन्दर सिंहजी महाराज

आज बरेच लोक खूप तणावातून जात आहेत यात शंका नाही. आपल्या जीवनात खूप तणाव वाढलेला आहे. यामुळे आपले शरीरावर व बुद्धीवर फार वाईट परिणाम घडत आहेत. आपण पाहतो आज लोक चिंता, भीती, उदासीनता आणि तथ्यहीन भयातून जात आहेत. लोक जीवनात दु:खाचा सामना करू शकत नाहीत आणि हेच कारण आहे की मनोविकार तज्ज्ञ, हृदय चिकित्सक यांचे दवाखाने गर्दीने भरलेले आहेत, असे आपल्याला पहावयास मिळते. आपण आर्थिक रुपाने खूप अडचणीमध्ये आहोत. वैवाहिक जीवनात नातेसंबंध तुटत असल्याचे व उजाड झालेल्या घरांना प्रस्थापित करण्याचा, आपण प्रयत्न करीत असतो. काही लोक उदासीन वातावरणात चिंतित दिसतात. कुणी प्रियजन दगावले आहेत, त्यांच्या जाण्याने त्यांच्या जीवनात भय उत्पन्न होते. काही जीव अशाप्रकारे नाराज होतात आणि त्यांना जीवनात आशेचा किरण डोळ्यासमोर दिसत नाही. या अवस्थेचा परिणाम केवळ आपल्या मनावर होत नसून वैज्ञानिकांच्या मते, त्यांच्या शोधाने सप्रमाण सिद्ध झाले आहे की माणसाच्या मनाचा तसेच शरीराचा परस्पर जवळचा संबंध आहे. जो अनेक प्रकारच्या आजारांना जन्म देतो.

निरीक्षणाने हे सिद्ध केले आहे की आपण जेव्हा रागावतो अथवा खूप जास्त भावूक होतो त्यावेळी आपल्या शरीरात एक वेगळ्या प्रकारची अस्वस्थता निर्माण होते, जी आपल्याला भांडण किंवा घर सोडून जाण्यासाठी विवश करू शकते; परंतु आपण सामाजिक बंधनांना घाबरून निमूटपणे सर्व काही सहन करतो. अशावेळी आपल्या भावनांची आपल्यात घुसमट होत असते. याचा परिणाम असा होतो की आपण शारीरिक रुपाने प्रभावित होतो आणि अनेक प्रकारच्या आजारांना बळी पडतो. उदाहरणार्थ रक्तदाब वाढणे, हृदयविकार,
दमा, पचनक्रिया खराब होणे, स्नायूंच्या पेशींना त्रास होणे, त्वचेवर पुळ्या-फोड येणे अशा अनेक प्रकारच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. अशा प्रकारच्या आजारपणावर उपचार असा नाही की आपण क्रोधाचे तंट्यात रुपांतर करावे अथवा सर्व काही सोडून निघून जावे. असे केल्यामुळे आपल्या नातेसंबंधात आणखी दुरावा निर्माण होतो. आवश्यकता या गोष्टीची आहे की आपण असे काही पर्याय शोधले पाहिजे ज्यामुळे मानसिक तणाव, भावजीवन आणि शरीरावर होणारा दुष्परिणाम आपल्याला दूर करता येईल. आज या गोष्टीची गरज आहे.

मागील काही वर्षांपासून अशा भावनांच्या वादळात आणि तणाव संपवण्यासाठी बºयाच लोकांचा कल ध्यान अभ्यासाकडे वळलेला आहे. ध्यानाचा शारीरिक आणि मानसिक खूप फायदा आहे हा एक सुरक्षित, फायदेशीर आणि निशुल्क असा उपाय आहे. आपण एकदा जरी ध्यान अभ्यास विधी शिकलो तर आपल्या प्रत्येक समस्येचे निराकरण करता येईल. याचा उपयोग आपण कोणत्याही वेळी कोठेही आणि कोणत्याही जागी करू शकतो. ध्यानामुळे आपल्याला दोन प्रकारे मदत होते. प्रथम आपणाला शारीरिक दृष्ट्या दुसरा प्रकार म्हणजे या
अवस्थेला पोहोचून आपण प्रभूंचे प्रेम आणि परम आनंदामध्ये दंग होऊन जातो. आपण भौतिक जगतातील दु:ख विसरतो. ध्यानाच्या वेळी आपल्या संसारी समस्या जशाच्या तशाच राहतात; परंतु ध्यान केल्यामुळे आपण भौतिक जगात जगत असताना प्रभूच्या आठवणीत आणि त्यामुळे होणाºया आनंदात अशाप्रकारे दंग होतो की आपणाला आपल्या समस्या दु:ख व यातनांचा आभासही होत नाही. संसारिक तणाव आणि दबाव असताना सुद्धा आपले विचार, वैचारिक शक्ती आणि आपल्या मनातील भावना संतुलित राहतात. आपण तणावावर
सहजपणे नियंत्रण मिळवू शकतो. ध्यान-अभ्यास केल्याने आपण आयुष्य कसे जगावे ही कला, हे तंत्र शिकतो. यामुळे आपल्या संसारातील तणावावर नियंत्रण करता येते. ध्यान-अभ्यासाच्या सरावामुळे आपण आपल्या जीवनात सुख शांती आणि आनंद प्राप्त करू शकतो.

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *