Home राजधानी मुंबई सरकारतर्फे राज्यभर चित्रीकरण परवानगीसंबंधी मोठा निर्णय

सरकारतर्फे राज्यभर चित्रीकरण परवानगीसंबंधी मोठा निर्णय

94

मुंबई : मुंबई व उपनगर परिसरात चित्रपट निर्मिती, दूरचित्रवाणी मालिका, जाहिराती, माहितीपट, वेबसीरीज इत्यादीच्या चित्रीकरणासाठी आवश्यक विविध परवानगी एक खिडकी योजनेतून दिल्या जातात. आता या योजनेचे विस्तारीकरण करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
दादासाहेब फाळके चित्रनगरीमार्फत राबवल्या जाणाºया एक खिडकी योजनेबाबतचे सादरीकरण आज सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक मनीषा वर्मा, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, चित्रनगरीच्या सहव्यवस्थापकीय संचालक आंचल गोयल यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
आज मुंबई देशाची आर्थिक राजधानीबरोबरच सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते. मुंबई आणि उपनगरासह राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये चित्रीकरण सुरू असते. अशावेळी एक खिडकी योजनेचे विस्तारीकरण करणे आवश्यक आहे. पुढील काळात या योजनेचे विस्तारीकरण करताना पुणे, नाशिक, औरंगाबाद, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विस्तारीकरण करण्याबाबतचा विचार करण्यात यावा़ याठिकाणी ही योजना अंमलात आणल्यावर उर्वरित महाराष्ट्रातही एक खिडकी योजना राबवण्यात येईल, असे मंत्री देशमुख म्हणाले.
राज्यात मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट आदींची निर्मिती होते. त्यांच्या चित्रीकरणासाठी आवश्यक त्या परवानग्या तातडीने उपलब्ध होण्यासह व्यवसाय सुलभतेसाठी चित्रीकरणासाठीच्या आवश्यक 30 हून अधिक परवानग्या एक खिडकी योजनेतून देण्यात येतात. या योजनेंतर्गत चित्रीकरणासाठी आवश्यक परवानग्या सात दिवसांच्या आत देण्यात येतात. दादासाहेब फाळके चित्रनगरीमार्फत आॅनलाईन पद्धतीने परवागनी मिळत निर्मात्यांना अटीशर्तीचे पालन करून चित्रीकरणासाठी शुल्क करूना परवानगी देण्यात येते.