Home राष्ट्रीय नव्या वर्षातच कोरोना लस : डॉ. हर्षवर्धन

नव्या वर्षातच कोरोना लस : डॉ. हर्षवर्धन

79

नवी दिल्ली : देशात नव्या अर्थात पुढील वर्षातच कोरोनाची लस मिळेल, अशी आशा आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केली आहे.
जगभरात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असताना लस कधी येणार याकडे संपूर्ण जगवासीयांचे लक्ष लागले आहे. त्यावर आरोग्यमंत्री यांनी वरील स्पष्टीकरण दिले आहे.
डॉ. हर्षवर्धन म्हणाले, की सन 2021 च्या सुरुवातीलाच भारतात कोरोनाची लस उपलब्ध येईल. विशेष म्हणजे एकापेक्षा अधिक कंपनीच्या कोरोना लशी उपलब्ध होतील. सध्या तिच्या वितरणाविषयीच्या योजनेबाबत तज्ज्ञांनी समिती काम करत आहे.