विधानसभा अध्यक्षांच्या हस्ते आरोग्य तपासणी मोबाईल व्हॅनचे लोकार्पण

(Last Updated On: October 13, 2020)

भंडारा  : कोविड-19 संबंधी तपासणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून तयार करण्यात आलेल्या मोबाईल आरोग्य तपासणी व्हॅनचे लोकार्पण विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले.
आरोग्य व्हॅनमध्ये एक डॉक्टर आणि सहकारी उपलब्ध असेल. पल्स आॅक्सिमिटर, ताप तपासणी यंत्र व औषधीही असतील. ताप, रक्तदाब, मधुमेह तपासणी आदी आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. नागरिकांना अगदी मोफत औषधी देण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. गंभीर आजार असलेल्या रुग्णांना संदर्भीय सेवा सुद्धा देण्यात येईल. ही मोबाईल व्हॅन जिल्ह्यात फिरून नागरिकांची आरोग्य तपासणी करणार आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या विनंती वरून एचडीएफसी बँकेच्या वतीने सुविधायुक्त अशीच आणखी आरोग्य तपासणी मोबाईल व्हॅन जिल्ह्याला लवकरच उपलब्ध करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *