Home प्रादेशिक पश्चिम महाराष्ट्र धनाजी यमकर, सुशांत शेलार यांची कोल्हापूर चित्रनगरीला भेट

धनाजी यमकर, सुशांत शेलार यांची कोल्हापूर चित्रनगरीला भेट

107

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांच्यासह प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार यांनी कोल्हापूर चित्रनगरी येथे नुकतीच भेट दिली.
चित्रनगरीचे अधिकारी दिलीप भादिगरे यांनी कोल्हापूर चित्रनगरीतील सोयीसुविधांबाबत सविस्तर माहिती दिली. भविष्यात गरजेच्या सुविधा महाराष्ट्र शासनाकडून उपलब्ध होतील, याबाबत पाठपुरावा महामंडळाने करावा, असे मत व्यक्त केले. त्यावर महामंडळाचे प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार यांनी कोल्हापूर चित्रनगरीसाठी आवश्यक असणारा निधी उपलब्धतेसाठी तातडीने प्रयत्न करण्यात येतील. लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सांस्कृतिक मंत्री, सांस्कृतिक राज्यमंत्री तसेच कोल्हापूर चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक यांना कोल्हापूर चित्रनगरी विषयाबाबत मुंबई येथे बैठक आयोजन करण्यासाठी लेखी पत्र देण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
त्यानंतर दख्खनचा राजा जोतिबा मालिकेचे कलाकार व तंत्रज्ञ यांची भेट घेण्यात आली. तसेच चित्रीकरणाची पाहणी करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिवसेनाच्या कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी उप प्रमुख स्मिता मांडरे, अभिनेते मंजित माने, अरुण भोसले, महामंडळाचे प्रमुख व्यवस्थापक रवींद्र बोरगावकर आदी उपस्थित होते.