Home पूर्व विदर्भ ट्रक अपघातातील मृत युवकांना दोन लाखांची सानुग्रह मदत

ट्रक अपघातातील मृत युवकांना दोन लाखांची सानुग्रह मदत

71
vijay vadettiwar

चंद्रपूर : खरकाडा ते आरमोरी मार्गावर सकाळी फिरावयास गेलेल्या दोन युवकांचा ट्रकने दिलेल्या धडकेत मृत्यू झालेल्या दोन युवकांना दोन लाखांच्या सानुग्रह अनुदान देण्याची ग्वाही मदत व पुनर्वसन मंत्री तसेच पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
खरकाडा गावातील प्रशांत सहारे आणि रोहित चट्टे हे दोघे रोज सकाळी साडेचार वाजता खरकाडा -आरमोरी रस्त्यावर व्यायामानिमित्ताने जात होते. 9 आॅक्टोबरच्या सकाळीही ते गेले असता एका वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. पालकमंत्री वडेट्टीवार यांनी सोमवारी ब्रह्मपुरी दौºयादरम्यान दोन्ही युवकांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच, मुख्यमंत्र्यांना विनंती करून सहायता निधीतून दोन लाख रुपये सानुग्रह मदत देण्याचे आश्वासन दिले.