Home मुंबई घरगुती कामगार महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारचे प्रयत्न

घरगुती कामगार महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारचे प्रयत्न

66

कामगार महिलांकरिता निधी उभारण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील साधारण: 3.65 कोटींपैकी 50 लाख कामगार संघटित क्षेत्रात येतात. इतर सर्व कामगारांच्या नोंदणाकरिता जिल्हास्तरावर लवकरच नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विनिता वेद सिंगल यांनी दिली.

मुंबई : असंघटित क्षेत्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाचा भाग असलेले महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ पुनर्जिवीत होणे गरजेचे असून त्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या मंडळाद्वारे नव्या योजना राबवण्यासाठी अधिकाºयांनी कृतीआराखडा तयार करावा, असे निर्देश महिला व बाल विकासमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.
घरगुती कामगारांची कामगार कायद्यान्वये नोंदणी, त्यांच्या मुलांचे शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण देणे आदींच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी कामगार विभागाच्या सचिव विनिता वेद सिंगल, कौशल्य विकास विभागाच्या सचिव अंशू सिन्हा, आयुक्त दीपेंद ्रसिंह कुशवाह, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा सुशीबेन शहा, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाचे सरचिटणीस उदय भट यांच्यासह नीला लिमये, श्रीमती क्रिस्टिना, महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती, कामगार एकता युनियन आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते.
घरगुती कामगार, मदतनीस यांची शहरात महत्त्वाची भूमिका असते. एकूण घरगुती कामगारांपैकी 95 टक्के महिला आहेत. कोरोना कालावधीमध्ये असंघटित क्षेत्रातील महिला आणि त्यांचे कुटुंब आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ पुनर्जिवीत करण्यासाठी प्रयत्नशील राहू. सध्याच्या योजनाव्यतिरिक्त नव्या कल्याणकारी योजना राबवता येतील. तसेच, महिला कामगारांना इतर कौशल्य विकासाबाबत प्रशिक्षण देण्याकरिता ठोस कार्यक्रम हाती घ्यावेत़ केंद्र सरकारच्या नव्या कामगार कायद्यात घरेलू कामगारांसाठी स्वतंत्र यंत्रणा नाही़ मात्र, महाराष्ट्रात घरेलू कामगार मंडळ अस्तित्वात असून त्याची स्वायत्तताबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here