Home राष्ट्रीय कोविड-19 काळात निवडणूकसंबंधी सुधारित मार्गदर्शकतत्त्वे जारी

कोविड-19 काळात निवडणूकसंबंधी सुधारित मार्गदर्शकतत्त्वे जारी

64

नवी दिल्ली : कोविड-19 काळात सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचाराकरिता स्टार प्रचारकांसाठी भारत निवडणूक आयोगाने सुधारित मार्गदर्शकतत्त्वे जारी केली असून या निवडणुका निष्पक्ष, शांततापूर्ण, पारदर्शक, नैतिक आणि सुरक्षितरित्या व्हाव्या हा यामागील मुख्य उद्देश आहे. भविष्यात कोविड-19 काळात होणाºया निवडणुकांत प्रचारासाठी स्टार प्रचारकांना सर्व नियमांचा अवलंब करावे लागेल, असे निवडणूक आयोगाने नमूद केले आहे.
नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार आता मान्यताप्राप्त राष्ट्रीय / राज्यस्तरीय राजकीय पक्षाला स्टार प्रचारकांची संख्या 40 ऐवजी तीस ठेवावी लागेल. तसेच, नोंदणीकृत राजकीय पक्षांसाठी स्टार प्रचारकांची संख्या 20 ऐवजी 15 असेल. त्याचप्रमाणे स्टार प्रचारकांची यादी सादर करण्याचा कालावधी अधिसूचना जारी केल्यानंतर सातऐवजी 10 दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे. ज्या राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांची यादी सादर केलेली आहे, त्यांना सुधारित यादी दिलेल्या कालावधीत पुन्हा सादर करावी लागेल. स्टार प्रचारकांच्या सभेसंबंधी परवानगी घेण्यासाठी प्रचाराच्या 48 तास अगोदर जिल्हा निवडणूक प्रशासनाकडे याची माहिती द्यावी लागेल, जेणेकरून सर्व सुरक्षा उपाय वेळेत करणे शक्य होईल.
21 आॅगस्ट 2020 रोजी आयोगाने निवडणुका आयोजित करण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.
निवडणूक आयोगाने बिहार भेटीत सार्वत्रिक निवडणुकांच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. यासाठी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय पक्ष राज्याचे मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह), मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलिस अधीक्षक आदींशी विस्तृत चर्चा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here