Home राजधानी मुंबई लोकभावनेची दखल घेत वाढीव वीजबिलासंबंधी दिलासा मिळावा

लोकभावनेची दखल घेत वाढीव वीजबिलासंबंधी दिलासा मिळावा

41

मुंबई  : जूनमध्ये वीज वितरण कंपन्यांकडून वाढीव देयके देण्यात आल्याने अशा कुटुंबांच्या अडचणींत वाढ झाली. शासनाने यासंदर्भात हस्तक्षेप करून सर्वांना दिलासा द्यावा आणि देयकांची रक्कम कमी करावी. या लोकभावनेची दखल घेवून कार्यवाही करावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद देत वित्तमंत्री यांच्याशी चर्चा करून त्याबाबत प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही दिली.
कोरोना टाळेबंदीच्या काळात संपूर्ण राज्यात आलेल्या वाढीव वीजबिलांसंदर्भात विधानभवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. डॉ. नितीन राऊत, अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, उपसचिव प्र.पु. बंडगेरी यांच्यासह राज्य महावितरण कंपनी, बृहन्मुंबई वीजपुरवठा आणि परिवहन उपक्रम, अदानी आणि टाटा समूहाचे पदाधिकारी उपस्थित होते.
राज्य शासनाच्या सूचनेनुसार वीज पुरवठा खंडीत करण्यात आला नाही. तीन महिन्यांचे वीज बिल एकत्रित देण्यात आल्याने ही दरवाढ समजण्यात येत आहे. वीज वितरण कंपन्यांनी प्रत्यक्षात जादा आकारणी केलेली नाही. ग्राहकांना वीज बिल हप्त्यांवर भरण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. टाळेबंदीच्या काळात ज्या ग्राहकांनी आॅनलाईन मीटरचे रिडींग पाठवले त्यांना त्यानुसार देयके पाठविण्यात आली. तसेच, एकरकमी वीज बिल भरणाºया ग्राहकांना सवलतही देण्यात आली आहे. उद्योग क्षेत्रातही वीज खंडीत करण्यात आली नसल्याचे वीज वितरक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here