Home उपराजधानी नागपूर नागपूर सायबरकडून नायजेरियन टोळीला अटक

नागपूर सायबरकडून नायजेरियन टोळीला अटक

92

नायजेरीयन नागरिकांची मोठी वसाहत दिल्ली येथील उत्तामनगर याठिकाणी आहे. यातील खोटे ेबँॅक खाती, खोटे सीमकार्डस् वापरत आहेत. गुन्ह्यात वायफाय इंटरनेट, लॅपटॉप तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात. सदर गुन्हेगाार पाच ते 10 टक्क्यांच्या दलालीवर भारतीय नागरिकांची मदत घेत असल्याचे आढळून आले आहे.

नागपूर : शहरातील एका सेवानिवृत्त महिलेस विदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने तब्बल 41 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चार नायजेरियन [ Nigerian Fraudsters Gang ] नागरिकांचा समावेश असलेल्या पाच जणांच्या टोळीला नवी दिल्लीत अटक करण्यात आली आहे़ ही कारवाई नागपूर आयुक्तालयाअंतर्गतच्या सायबर विभागाने केली आहे. याबाबतची माहिती अपर आयुक्त (गुन्हे) सुनिल फुलारी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
सूत्रांनुसार, फिर्यादी आयवन सिंग समशेर सिंग (जय बजरंग सोसायटी, मानवसेवानगर, सिमनेरी हिल्स, नागपूर) यांची पत्नी रिना न्यूटन हिची फेसबुकवकरून डॅनी मोरेर या वैद्यकीय अधिकाºयाशी ओळख झाली़ रिना या सेनादलातून सहायक वैद्यकीय अधिकारी म्हणून निवृत्त झाल्या असून डॅनी मोरेर याने त्यांना कॅनडा येथे नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने विविध प्रकारचे आमिष दाखवून 41,70 हजार रुपयांची फसवणूक केली. फिर्यादी यांनी आठ विविध बँकेमध्ये सदर रक्कम भरली असल्याचे नमूद केले आहे.
तांत्रिकदृष्टया क्लिष्ट असल्याने सदरचा गुन्हा  सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. तपासादरम्यान बँक खात्यांची माहिती घेण्यात आली. तसेच, एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करण्यात आले. यासर्व बाबींवरून आरोपी दिल्ली येथे असल्याचे निष्पन्न झाल्याने नागपूर पोलिसांनी दिल्लीत धडक देत सुजित दिलीप
तिवारी (पटेलनगर, डी ब्लॉक, व्दारका मोर, नवी दिल्ली), मिशेल स्कॉटस कोलाई (युनियन बँकेजवळ बळवंत रोड, चंदर विहार, नवी दिल्ली), इदु डॉलर उकेके, इमू
संडे अझुडाईके (मोहन गार्डन नवी दिल्ली), केल्वीन नेके (पिलर गल्ली 795,
विपीन गार्डन, कोरकोला, नवीन दिल्ली) या सर्वांना ताब्यात घेतले.
सदर गुन्ह्याचा तपास पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अपर आयुक्त (गुन्हे) सुनिल फुलारी, उपायुक्त (आर्थिक) विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ़ अशोक बागुल, पोलिस निरीक्षक राघवेंद्र सिंह क्षीरसागर, सपोनि विशाल माने, पोलिस हवालदार संजय तिवारी, नापोशि राहुल धोटे, पोशि अजय पवार, दीपक चौहान, बबलू ठाकूर यांनी केलेला आहे.