विनामास्क फिरणाºया व्यक्तींवर दंडात्मक कारवाई

(Last Updated On: October 14, 2020)

नागपूर : शहरात कोराना विषाणूचा प्रादुर्भाव तसेच प्रसार झपाट्याने वाढत असल्याने त्यास प्रतिबंध करण्याकरिता पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलिस ठाणे आणि वाहतूक शाखेमार्फत मंगळवारी विनामास्क फिरणाºया व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. यात एकूण 65 हजार 600 रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत पोलिस ठाण्याअंतर्गत 65 प्रकरणांमध्ये 23 हजार 700 रुपये तर वाहतूक पोलिस विभागाकडून 94 प्रकरणात 41 हजार 900 रुपये दंडाच्या स्वरुपात वसूल करण्यात आले.
ेसर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वाहतूक करताना किंवा वावरताना तोंडाला मास्क लावावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सुरक्षित सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) ठेवावे. तसेच, पोलिस विभागाला सहकार्य करून स्वत:वरील कारवाई टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (सकारात्मक छायाचित्र साभार)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *