Home राजधानी मुंबई चालू आठवड्यात दमदार पाऊस

चालू आठवड्यात दमदार पाऊस

74

मुंबई : चालू आठवड्यात राज्यातील सर्व भागात दमदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. परतीच्या पावसामुळे आज सांगली जिल्ह्यात ऊस शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज असल्याचेही म्हटले आहे. आहे. सध्या बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते पुढील तीन दिवसांत महाराष्ट्रावरून सरकत 16 आॅक्टोबरला अरबी समुद्रात प्रवेश करण्याचा अंदाज आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राने आंध्र प्रदेशची किनारपट्टी ओलांडली आहे. हे क्षेत्र पश्चिम दिशेत 14 आणि 15 तारखेला महाराष्ट्रावरून प्रवास करेल. 16 तारखेच्या सकाळी हीच स्थिती राहणार असून त्यानंतर कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, 14 ते 16 आॅक्टबरच्या काळात
मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, मागील आठवड्यात बहुतांश जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाने कापणीला आलेला धान, सोयाबीन यासह कापसाचेही मोठे नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here