Home प्रादेशिक पश्चिम महाराष्ट्र मंदिरे उघडण्यासाठी राज्यभरात आंदोलन

मंदिरे उघडण्यासाठी राज्यभरात आंदोलन

108

सोलापूर : राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपकडून मंगळवारी विविध मंदिरांच्यासमोर आंदोलन करण्यात आली.
सोलापुरात मल्लिकार्जुन मंदिर परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, विक्रम देशमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.
औरंगाबादेत संजय जोशी यांच्या नेतृत्वाखाली गारखेडा परिसरात गजानन महाराज मंदिरासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. आंदोलनात भाजपाच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, खासदार डॉ. भागवत कराड यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मुंबईत सिद्धीविनायक मंदिरासमोर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन केले. याशिवाय आपल्या मागणीसाठी यवतमाळातील प्राचीन केदारेश्वर मंदिरासमोर स्थानिक आमदार मदन येरावार यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
दरम्यान, सप्तश्रृंग गड येथे येत्या शनिवारपासून नवरात्र सुरू होत असून सरकारने मंदिर उघड्यास परवानगी न दिल्याने गावकºयांनी आपले गाव दत्तक घेण्याची मागणी केली आहे.