Home राजधानी मुंबई ऊर्जामंत्र्यांनी वर्तवली वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता

ऊर्जामंत्र्यांनी वर्तवली वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता

76

मुंबई: मागील सोमवारी मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, अशी शक्यता राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वर्तवली आहे.
सोमवारी सकाळच्या सुमारास मुंबईसह उपनगरांमध्ये अचानक वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे मंत्रालयापासून ते झेरॉक्सच्या दुकानापर्यंत अनेक कामे काही तास रखडली होती. वीज पुरवठा ठप्प झाल्यामुळे मुंबईकडे येणाºया आणि मुंबईतून जाणाºया रेल्वेगा स्थानकांमध्येच काही तास ताटकळत उभ्या राहिल्या होत्या. याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी तपासाचे आदेश दिले होते.