Home प्रादेशिक उतर महाराष्ट्र एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादीत?

एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादीत?

102

धुळे : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्रातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा प्रवेश करण्याची शक्यता आहे. मराठी वृत्तवाहिनी ‘आयबीएन लोकमत 18’ ने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे.
मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा माध्यमातून सुरू होत्या. आता त्यासंबंधी मुक्ताईनगरमध्ये बैठक पार पडली असून यावेळी पुढील आठवड्यात राष्ट्रवादीत प्रवेश होण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे यांच्यासह आपण लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहोत, अशी माहिती
धुळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी दिली. विधानसभा निवडणुकीत त्यांनी सेनेचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला होता. काही महिन्यांपासून पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा सुरू होती, असेही सदर वृत्तवाहिनीने म्हटले आहे.