Home उपराजधानी नागपूर गुंडाची गळा कापून हत्या, चौघे अटकेत

गुंडाची गळा कापून हत्या, चौघे अटकेत

67

नागपूर : गुंडाची गळा कापून हत्या केल्याची घटना बुधवारी संध्याकाळी नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरातील चनकापूर येथे घडली. अश्विन ढोणे (24) असे मृतकाचे नाव असून, हत्येप्रकरणी चौघांना अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विन ढोणे आणि आरोपी शुभम पाटील हे दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. शुभमजवळ 4 ते 5 लाख रुपये असल्याची माहिती अश्विनला मिळाली होती. यानंतर त्याने आपला वाटा मागितल्याने दोघांमध्ये वाद झाला. नकार मिळाल्याने अश्विनने पाहून घेण्याची धमकी दिल्याने भांडण शिगेला पोहोचले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here