Home प्रादेशिक पश्चिम महाराष्ट्र मुंबई, ठाण्याला ‘रेड अलर्ट’, पुण्यात चार बळी

मुंबई, ठाण्याला ‘रेड अलर्ट’, पुण्यात चार बळी

65

मुंबई : रात्रभर झोडपून काढल्यानंतर पुण्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. दुसरीकडे हवामान विभागाने मुंबई आणि ठाण्याला अतिदक्षतेचा इशारा (RED ALERT TO MUMBAI) दिला आहे. दरम्यान, दौंड तालुक्यातील (जि. पुणे) राजेगाव नाल्यात दोन दुचाकीवरील चौघेजण वाहून गेले असून तिघांचे मृतदेह सापडल्याची माहिती आहे.

मागील चार ते पाच दिवसांपासून राज्यात पावसाचा धुमाकूळ घातला असून ग्रामीण भागांसह शहरांत मुसळधार कोसळत आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे. बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुण्यातील अनेक भागांत पाणी साचले आहे. तसेच, अनेक घरांमध्ये शिरले होते. पाणी ओसरले असले तरी यात मोठे नुकसान झाले आहे. शहरातील रस्त्यांवर वाहने बंद पडल्याचे दिसून आले.

pune rain

तसेच, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्याचे वृत्त आहे. याशिवाय पुणे-अहमदनगर मार्गावरील पाणी अद्याप कायम असून वाहतूक बंद पडली आहे. सातारा शहर आणि जिल्ह्यात बुधवारी रात्री झालेल्या मुसळधारेने धुमाकूळ घातला असून मानगंगा नदीला महापूर आला आहे. दुसरीकडे बिंदुसरा आणि माजलगाव धरण ओसंडून वाहत असून जायकवाडी धरणाचे 11 दरवाजे उघडले आहे.
हवामान विभागाने कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी किनारपट्टी भागात रिमझिम पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. या भागात ४० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून नागरिकांनी समुद्राच्या जवळ जाऊ नये, असा प्रशासनाने इशारा दिला आहे. राज्यातील अनेक भागात पुढील 3 ते 4 दिवस पावसाची स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.(संग्रहित छायाचित्र)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here