खूप्पचं बरा वाटला गं स्वभावानं… Tapori Turaki

(Last Updated On: October 16, 2020)

पिंकीच्या लग्नाच्या दिवशी ‘हाराडेरा’(निरोप देणे) च्यावेळी तिचा लहान भाऊ विचारतो,
ताई, फक्त तूच का रडत आहेस,
भाऊजी का नाही रडत?
त्यावर त्याचे वडिल रावसाहेब म्हणाले,
बाळा, ताई फक्त फाटकापर्यंत रडेल…मग
तिकडून तुझे भा्जी आयुष्यभर रडतील.

***
नोकर : साहेब मला केराच्या टोपलीत शंभराच्या पाच नोटा सापडल्या, हे घ्या.
मालक : अरे, मीच फेकून दिल्या होत्या, नकली नोटा आहेत त्या…
(दोन सेकंदानंतर)
नोकर : म्हणूनच परत करीत आहे.

***
वडिलांनी दिन्याच्या कपड्यांची झडती घेतली…
निघाले तर काय सिगारेट, काही मुलींचे नावासह मोबाईल नंबर निघाले.
वडिलांनी त्याला चिंब होईपर्यंत बदड बदड बदडून काढले.
…आणि म्हणाले केव्हापासून सुरू आहे हे
सगळं?  बंडू रडत रडत म्हणाला, कुठं काय सुरू आहे, सर्व बंद आहे़ पप्पा ही पँट माझी नाही, तुमची आहे.

***

दोन जिवलग मैत्रिणी, मनी आणि बनी गप्पा मारत होत्या.
मनी : अग तुला सांगू, काल भलतीच गडबड होता होता वाचली.
बनी : काय गं काय झालं ?
मनी : अगं मी देवळात गेले होते.
बनी : बरं मग…देव होते ना तिथं
मनी : मी देवापाशी मागणार होते, की ‘ह्यांचे’ सगळे त्रास कष्ट काढून घे म्हणून…
बनी : मग त्यात काय?
मनी: …पटकन लक्षात आलं आणि थांबले़ म्हटलं देव मलाच उचलायचा…

***
सुलभा मैत्रिणीला : काल दिवसभर ‘नेट’ चालत नव्हते.
मैत्रीण : त्याला नेट लागला असणाऱ बरं मग काय केलं ?
सुलभा : काही नाही. चक्क नवºयाबरोबर गप्पा मारत होते.
मैत्रीण : अय्या हो!
सुलभा : खूप्पचं बरा वाटला गं स्वभावानं…

****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *