Home प्रादेशिक उतर महाराष्ट्र महिला शेतकºयांना सन्मान मिळावा : कृषिमंत्री

महिला शेतकºयांना सन्मान मिळावा : कृषिमंत्री

43

मालेगांव (नाशिक) : राज्यात शेतीवर काम करणाया महिलांनी एकत्रित येऊन शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन कराव्यात. शेती उत्पादित मालाला बाजारपेठेत स्थान निर्माण करून महिलांना शेतकरी उद्योजक म्हणून काम करताना त्यांना मानसन्मान मिळवून द्यावा, असे आवाहन कृषी तथा माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

सशक्त महिला सशक्त भारत ही संकल्पना देशात व राज्यात राबविण्यात येत आहे. आज महिला शेतकरी काबाडकष्ट करत असून त्यांना पैशांची बचत करणे, आर्थिक व्यवहार करणे, भाजीपाल्याची स्वच्छता व प्रतवारी करून बाजारात पाठविणे, मूल्यवर्धन करणे आदी कामे सर्वदूर महिला शेतकरी करत आहेत. मात्र, अजूनही आपल्या देशात हवा तसा मानसन्मान शेतकरी भगिनींना मिळत नाही. नवनवीन कृषि तंत्रज्ञान, आधुनिकीकरणाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. त्याकरिता कृषि विभागामार्फत महिलांच्या शेतीशाळा आयोजित करण्यात येत आहे. तंत्रज्ञानाची माहिती होऊन त्याचा वापर केल्याने त्यांचे शेती उत्पादनात निश्चितच भर पडली आहे. याचबरोबर महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी नवीन योजना प्रस्तावित असून मंजुरीनंतर लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
शासनामार्फत शेतकºयांना स्थानिक पातळीवर भाजीपाला रोपे मिळणेकरिता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर भाजीपाला रोपवाटिका करिता शासनामार्फत अनुदान देण्यात येणार असुन त्यात प्राधान्याने महिला कृषी पदवीधर यांना लाभ दिला जाणार असल्याचे त्यांनी सागितले. महिला शेतकरीवर्गासाठी दिवसा विद्युत पुरवठा करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here