लोकांना विश्वासात घेत काम करा : मुख्यमंत्री

राजधानी मुंबई

मुंबई : राज्यात पुन्हा काही दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे स्वत:सह नागरिकांनाही गाफील राहू देऊ नका. प्राणहानी होऊ नये यासाठी नागरिकांना विश्वासात घेऊन स्थलांतराची कामे करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे [CM THAKARE ON FLOOD ] यांनी राज्यातील प्रशासकीय यंत्रणेला दिले आहे.
पुणे, कोकण, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाºयांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे पूरस्थितीसंबंधी आढावा
बैठकीत ते बोलत होते. खासदार अनिल देसाई, खासदार विनायक राऊत, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, मदत पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर आदी उपस्थित होते.

मदत पथकाकडून अनेक ठिकाणी पूरग्रस्त नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. हे करताना कोरोनासंदर्भातील उपाययोजनांची काळजी घेण्यात यावी, मास्क, सॅनिटायझर यासारखी सुरक्षा साधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत. अजूनही काही दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यकतेनुसार भविष्यात करावयाचे स्थलांतराचे नियोजन करावे, स्थलांतरित कुटुंबांची काळजी घेण्यात यावी. पूर ओसरल्यानंतर ते पुन्हा त्यांच्या घरी गेल्यास त्यांना तिथे आवश्यक असणारी मदत पुरवण्यात यावी़ तसेच,पुराच्या पाण्यामुळे निर्माण होणारे संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना वेगाने हाती घ्याव्यात, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.
पूर आणि अतिवृष्टीने शेतपिके आणि मालमत्तेचे झालेल्या नुकसानीची वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत़ मृतकांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत देण्याचीही व्यवस्था करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *