गोसीखुर्द प्रकल्पाची कामे मुदतीत पूर्ण करा : वडेट्टीवार

पूर्व विदर्भ

चंद्रपूर : गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत चार तालुक्यात सुरू असलेली सर्व कामे मुदतीत पूर्ण करून शेतकºयांना कोणत्याही परिस्थितीत सिंचनाचा लाभ मिळवून द्यावा, अशा स्पष्ट सूचना मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी संबंधित अधिकाºयांना दिल्या.
ब्रह्मपुरी येथे प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या वितरण प्रणालीच्या कामांचा आढावा घेताना त्यांनी वरील सूचना केल्या. चारही तालुक्यातील शेतकºयांना अनेक वर्षांपासून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याचे स्वप्न दाखवतो आहोत. त्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी वितरण प्रणालीअंतर्गत कालवे आणि बंद नलिकेची कामे त्वरित पूर्ण करणे आवश्यक असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. अधिकारी, कंत्राटदार तसेच लाभ क्षेत्रातील लाभधारक यांच्यामध्ये समन्वयाची भूमिका बजावून कामे पूर्ण करावी. कामाचा दर्जा उत्तम असला असावा. ही कामे करीत असताना अडचणी येणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *