Home राजधानी मुंबई राज्य सरकार शेतकºयांच्या पाठिशी : महसूलमंत्री थोरात

राज्य सरकार शेतकºयांच्या पाठिशी : महसूलमंत्री थोरात

61

मुंबई : यावर्षीच्या पावसाने आधी विदर्भात पूरस्थिती निर्माण केली होती तर आता परतीच्या पावसाचाही मोठा फटका सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, सांगलीसह राज्याच्या इतर भागालाही बसला आहे. शेतातील उभी पिकेही वाया गेली आहेत. या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राज्य सरकार शेतकºयांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

पिकांसह अन्य नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच, केंद्र सरकारने राज्याला भरीव मदत देण्याची आवश्यकता आहे. आतापर्यंतचा अनुभव पाहता केंद्राकडून तुटपुंजीच मदत केली गेली आहे. आता तर राज्य सरकारसमोर कोरोना संकटामुळे मोठ्या आर्थिक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करून राज्याला जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी प्रयत्न करतील, असेही श्री. थोरात म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here