बिहार विधानसभा निवडणुकीत गृहमंत्री शहा प्रचार करणार

राष्ट्रीय

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीतील प्रचारकाळात गृहमंत्री अमित शहा यांच्या 12 रॅली होणार आहेत़ यातील काही दूरस्थ प्रणालीद्वारे, काही ठिकाणी ते प्रत्यक्ष संबोधित करतील, असे सांगण्यात येत आहे.
अमित शहा भाजपाला [ amit shaha in bihar vidhansabha election] पुन्हा सत्तेत आणण्यासाठी स्वत: मैदानात उतरणार आहेत. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक चर्चा सुरू असल्याने प्रत्यक्ष उपस्थिती कितपत असेल, हे लवकरच दिसून येईल, असे राजकीय जाणकार सांगतात. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही 12 प्रचारसभा होणार आहेत. त्यांच्या पहिल्या सभेची तारीख अद्याप अंतिम झालेली नाही. ते आरामधून प्रचाराचा शुभारंभ करण्याची शक्यता आहे. संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) अध्यक्ष नितीशकुमार यांच्यासोबतची ही संयुक्त सभा असेल.
दरम्यान, मागील सहा महिन्यांपासून देशात ठाण मांडून बसलेल्या कोरोना संकटात काही दिवसांपासून राजकीय नेत्यांचा सार्वजनिक वावर कमी झालेला आहे; परंतु बिहारच्या निवडणुकीत सत्ता मिळवण्याच्या निमित्ताने मतांचा जोगवा मागण्यासाठी सर्व लहान मोठ्या पक्षांचे नेते आसुसलेले आहेत. बिहारमध्ये 243 जागांसाठी तीन टप्प्यांत मतदान पार पडणार असून, 10 नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल. यात पहिला टप्प्यातील मतदान येत्या 28 तारखेला होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *