Home उपराजधानी नागपूर नवरात्रनिमित्ताने दीपस्तंभ धर्मदायी संस्थेचा ‘माझ्या ताईला साडी’उपक्रम

नवरात्रनिमित्ताने दीपस्तंभ धर्मदायी संस्थेचा ‘माझ्या ताईला साडी’उपक्रम

74

नागपूर : दीपस्तंभ धर्मदायी संस्थाच्या वतीने नवरात्रात ‘माझ्या ताईला साडी’ हा उपक्रम राबवण्यात येत असून समाजातील संवेदनशील आणि दानशूर व्यक्तीनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. हा उपक्रम घटस्थापना दिवसापासून सुरू होत असून विजयादशमीला समारोप होणार आहे.
अध्यक्ष राजेंद्र चौरागडे यांनी सांगितले की, या उपक्रमा अंतर्गत समाजातील गरीब, विधवा, गरजवंत अशा ५१ ‘जित्या जागत्या देवीं’ना साडीचोळी, धान्य, सॅनिटाईझर, औषधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. साडीचोळी देऊन त्यांच्या चेहºयावर हास्य फुलवावे हाच एकमेव प्रामाणिक उद्धेश आहे.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे सचिव नंदकिशोर मानकर मार्गदर्शक अजय उपलेंचीवर, शरद नार्लावार, विनोद महाजन, आनंद बोरकर, धीरज नारनवरे, कैलास येशने, प्रशांत कळसे,राजेंद्र केवटे, वर्षा मानकर, भारती चौरागडे, संगीता महाजन, लक्ष्मी विजयवार संगीता पानसे आदी सहकार्य करत आहे.