गृहमंत्र्यांनी ठणकावले, संपूर्ण बॉलीवूडची बदनामी येणार नाही

राजधानी मुंबई

शेकडो सिने तारे-तारका स्वातंत्र्यपूर्व काळातील लाहोर-कराचीपासून ते देशाच्या कानाकोपºयातून मुंबईत नशीब आजमवण्यासाठी येत राहिले आणि कायमचे मुंबईकर झाले. तेलुगु, मल्याळम, बंगाली, कन्नड, गुजराती, पंजाबी सिनेसृष्टीतल्या यशस्वी कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, गायक-गायिका, वादक, लेखक, कवी आदी सर्वांनीच देशपातळीवरची लोकप्रियता मिळवण्यासाठी मुंबईचा आधार घेतला. भविष्यात देखील देशातल्या कोणत्याही प्रांतातील कलाकारांना भारतीय सिनेसृष्टीचा मुकूटमणी असलेल्या बॉलिवूडमध्ये नशीब आजमावायचे असेल तर पोलिस, महाराष्ट्राची जनता तुमचे स्वागतच करेल. मुंबईचे महत्त्व व्हावे यासाठी बालिश प्रयत्न करणाºयांनी वेळीच शहाणे व्हावे, असेही मंत्री देशमुख यांनी सुनावले.

मुंबई : बॉलीवूडमधील काहीजणांचा ंअंमलीपदार्थ तस्कारांशी संबंध असल्याचे उघड होत आहे. त्याची चौकशी होऊन दोषींवर कारवाई झालीच पाहिजे; पण काहींच्या चुकीमुळे संपूर्ण बॉलीवूड त्यात अडकले असल्याचे म्हणणे योग्य होणार नाही. काही दोषींमुळे संपूर्ण क्षेत्राची बदनामी करता येणार नाही. नायक आणि खलनायक यात फरक करावाच लागेल, असे गृहमंत्री अनिल देशमुख [home minister anil deshmukh] यांनी परखडपणे स्पष्ट केले आहे.
देशाच्या उत्तरेकडे फिल्मसिटी उभारण्याची घोषणा झाल्यानंतर अचानकपणे भारतीय चित्रपटसृष्टीचे केंद्र असलेल्या मुंबईवर चिखलफेक सुरू झाली. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणाºया मुंबईतील बॉलिवूडला बदनाम करणाºयांचे यामागील हेतू लक्षात घेणे गरजेचे आहे. विशिष्ट विचारधारेतून बॉलिवूडवर हल्ले केले जात असल्याची शक्यता आहे. मात्र, शंभरपेक्षा अधिक वर्षांच्या मजबूत आणि समृद्ध परंपरेला मूठभरांच्या चिखलफेकीमुळे धक्का लागणार नाही, असा विश्वास मंत्री देशमुख यांनी व्यक्त केला.
बॉलिवूडशी संबंधित काही घटनांचा गैरफायदा घेत परदेशातील हजारो ‘फेक अकाऊंट’द्वारे मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्राची बदनामी करण्याचे प्रयत्न उघड झाले आहे. याच विचारधारेच्या लोकांनी आता बॉलिवूडला लक्ष्य केल्याचे दिसत आहे. मात्र, त्यांचे कट-कारस्थान उधळून लावण्यास महाराष्ट्र पोलिस सक्षम आहेत. महाराष्ट्र पोलिस सदैव तुमच्यासोबत आहेत, असा दिलासा मंत्री देशमुख यांनी दिला.
बॉलिवूडला मुंबईतून हलवण्यासाठी काहींनी देव पाण्यात घालून ठेवल्याचे दिसून येते. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी सन 1913 मध्ये ‘राजा हरिश्चंद्र’च्या रुपाने चित्रपट सृष्टीची बिजे या देशात सर्वात प्रथम रोवली. भारताला पहिला बोलपट ‘आलमआरा’ हादेखील देशात सर्वप्रथम (1931) मुंबईतच झळकला. 100 पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास असणारी मुंबई हीच देशाच्या सिनेसृष्टीचा केंद्र्रबिंदू होती, आहे आणि राहील. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या या लौकिकाला कुणी कितीही प्रयत्न केले तर धक्का लावू शकणार नाही़ देशाच्या कानाकोपºयातून कलाकार मंडळी मुंबईत, बॉलिवूडमध्ये येत असतात. त्यातूनच बॉलिवूडच्या पद्धतशीर बदनामीची मोहीम आज चालवली जात आहे, असे मंत्री देशमुख म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *