Home रानशिवार जीवनाच्या ध्येयपूर्तीकरिता पूर्ण समर्पण… SAAY pasaaydan

जीवनाच्या ध्येयपूर्तीकरिता पूर्ण समर्पण… SAAY pasaaydan

151

 संत राजिन्दर सिंहजी महाराज

जर सर्व युगांमध्ये आलेल्या संत-सद्गुरूंच्या जीवनावरती आपण नजर फिरविल्यास सर्वांमध्ये एक असा गुण दिसून येईल जो त्यांच्या सफलतेकरिता अतिआवश्यक होता. असे नव्हते की ते अलौकिक क्षमता घेऊन जन्मास आले होते, असे नव्हते की ते मानवापेक्षा काही अधिक होते. इतरांपेक्षा एक वेगळा गुण त्यांच्यात होता,
तो म्हणजे आध्यात्मिक धेयपूर्तीकरिता [ spiritual aim]  पूर्ण समर्पण. त्यांनी आपली नजर आपल्या ध्येया वरती टिकवून ठेवली आणि ते तोपर्यंत थांबले नाहीत जोपर्यंत आपल्या ध्येयापर्यंत पोहोचले नाहीत. जर आपण जीवनामध्ये कोणतीही ध्येय प्राप्त करू इच्छित असू, त्यामध्ये सफलतेचे रहस्य आहे ते म्हणजे उन्हाळा असो वा पावसाळा, समुद्र्र शांत असो वा वादळी आपल्याला आपल्या ध्येयावर टिकून राहायचे आहे. हे खरे आहे की आपण आध्यात्मिक ध्येय प्राप्त करू इच्छित असू किंवा भौतिक प्राप्ती करू इच्छित असू़ ज्या लोकांनी क्रीडा, विज्ञान किंवा कलाक्षेत्रामध्ये ध्येयपूर्ती केली त्यांनी ध्येयाकरिता केलेल्या समर्पणाचे परिणामत: आश्चर्यजनक यश प्राप्त केले.

जर आपण ध्यान अभ्यासाकरिता दृढ संकल्पाद्वारे समर्पित झालो तर आपणही सफल होऊ. समस्या ही नाही की आपण आध्यात्मिक सामर्थ्य बाळगत नाही. कारण ही देणगी आपल्यापैकी प्रत्येकाला प्राप्त आहे; परंतु समस्या ही आहे की आपल्यामध्ये समर्पण भाव नाही. एखाद्या दिवशी काही मिनिटांकरिता आपण ध्यान टिकवितो. पुन्हा पुढील काही दिवस आपण बिलकुल अभ्यास करत नाही. आणि तेव्हा पुढील काही दिवस एक तास ध्यान अभ्यास करतो. आणि असेही होऊ शकते की काही खास दिवसांमध्ये आपण पुन्हा जास्त वेळेकरिता ध्यान अभ्यास करू. हे खरे समर्पण नव्हे. हा केवळ अर्ध मनाने केलेला प्रयत्न आहे; परंतु जर आपण नियमित रूपाने ध्यानअभ्यासासाठी योग्य वेळ दिला तर आपली मनासारखी प्रगती होईल. जे खरोखर आध्यात्मिक विकास करू इच्छितात, दृढ संकल्प करून टिकून राहतात, तेच आध्यात्मिक मंडलांवर झेप घेऊ शकतात.

*****