…तोपर्यंत मास्क हीच उत्तम लस ठरणार : मुख्यमंत्री

(Last Updated On: October 19, 2020)

मुंबई : कोरोना विरुद्धचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे़ लस उपलब्ध होईपर्यंत चेहºयावरील मुखाच्छादन अर्थात मास्क हीच उत्तम लस ठरणार आहे, हे लक्षात घ्या आणि इतरांनाही सांगा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात आज दूरदृश्य प्रणालीद्वारा प्लाझ्मा थेरपी सुविधेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर ठेवणे आणि हातांची स्वच्छता राखणे ही त्रिसूत्री पाळण्याची शपथ सर्वांनी घ्यावी, अशी सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली.
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा प्लाझ्मा २८ दिवसानंतर घेण्यात आल्यानंतर त्याचा अतिगंभीर रुग्णांसाठी वापर केला जातो. लवकरच रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात आॅक्सिजन प्लान्ट बसवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *