Home राष्ट्रीय प्रदूषणाची समस्या सोडवण्यासाठी एकत्र प्रयत्न व्हावेत

प्रदूषणाची समस्या सोडवण्यासाठी एकत्र प्रयत्न व्हावेत

64

नवी दिल्ली : प्रदूषणाची समस्या सोडवण्यासाठी सार्वत्रिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत वन आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली. त्यांनी रविवारी ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून वायू प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र शासनाने केलेल्या उपाययोजनांविषयी माहिती दिली.
चारचाकी वाहनांच्या वापरामुळे वायू प्रदूषणात मोठी भर पडते. त्यामुळे अगदी जवळच्या कामांसाठी नागरिकांनी सायकल वापरता येईल.
वायू प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात आल्या. देशात प्रदूषणकारी घटकांच्या उत्सर्जनांसंदर्भातील ‘बीएस-6’ मानक लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. यामुळे येत्या काळात देशातील प्रदूषणाच्या पातळीत मोठी घट झाल्याचे दिसून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने २०१४ साली ‘राष्ट्रीय वायु गुणवत्ता निर्देर्शांक’ सुरू केला. हा निर्णय म्हणजे प्रदूषणाविरुद्धच्या लढ्यातील महत्त्वाचे पाऊल होते, असेही जावडेकर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here