मुंबई

सणासुदीच्या काळात अन्नधान्याचा तुटवडा भासू देणार नाही

(Last Updated On: October 20, 2020)

मुंबई : पंजाबमध्ये शेतकºयांचे आंदोलन सुरू असल्याने अन्नधान्याचा पुरवठा थांबलेला आहे. मात्र, सणासुदीच्या वेळी अन्नधान्याचा तुटवडा भासू देणार नाही, अशी ग्वाही अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
रेल्वे मार्गावर आंदोलनामुळे महाराष्ट्राला आणि अन्य राज्यांना पंजाबमधून होणारा अन्नधान्याचा पुरवठा थांबलेला आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने तातडीने उपाययोजना करून भारतीय अन्न महामंडळाकडे अतिरिक्त साठ्यातून मदत मागितली असून भारतीय अन्न महामंडळाकडून देखील पुरवठा केला जाणार आहे.
भारतीय अन्न महामंडळाने स्वत:कडे १०.९४ लाख मेट्रिक टन गहू आणि ४.८९ लाख मेट्रिक टन तांदूळ याचा अतिरिक्त साठा करून ठेवला आहे. भारतीय अन्न महामंडळाने आंध्र प्रदेशकडून तांदूळ आणि मध्य प्रदेशकडून गहू याची अतिरिक्त उचल सुरू केली आहे त्यामुळे महाराष्ट्राला यातूनच पुरवठा होणार आहे. येणाºया काळात असलेली दिवाळी आणि दसरा या सणांमध्ये कोणत्याही शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचा तुटवडा भासणार नाही, असेही मंत्री भुजबळ यांनी सांगितले.