Home पूर्व विदर्भ गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा खात्मा करणाºया पोलिस यंत्रणेचे कौतुक

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा खात्मा करणाºया पोलिस यंत्रणेचे कौतुक

71

 

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील कोसमी किसनेली जंगल परिसरात काल 18 आॅक्टोबर रोजी पाच नक्षलवाद्यांचा पोलिसांनी खात्मा केला. याबद्दल वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाईंनी स्वत: दूरध्वनीवरून त्यांचे कौतुक केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा उपविभागातील कोसमी किसनेली जंगल परिसरात रविवारी सायंकाळी 4.30 वाजता अप्पर पोलीस अधीक्षक मनिष कलवानीया यांच्या नेतृत्वाखाली ‘सी-60’ चे कमांडो नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल सी- 60 चे जवानांनी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला आणि या गोळीबारात पाच नक्षलवादी ठार झाले.
महाराष्ट्र पोलिस यंत्रणेतील गडचिरोली विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाºयांनी केलेल्या धाडसी कामगिरीबद्दल गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी गडचिरोली विभागातील पोलिस यंत्रणेची ही बातमी समजताच गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलिस अधीक्षक अंकित गोयल तसेच या धाडसी कारवाईत सहभागी झालेले अप्पर पोलीस अधीक्षक मनिष कलवानीया यांना स्वत: फोन करत त्यांचे विशेष अभिनंदन केले.
पाच नक्षलवाद्यांचा गडचिरोलीत खात्मा केल्याचे समजताच गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाईंनी आम्हाला तसेच येथील नक्षलग्रस्त भागात जीवाची बाजी लावून काम करणाºया पोलिस अधिकारी व कर्मचाºयांना फोनद्वारे केलेले कौतुक यंत्रणेचे मनोबल वाढविणारे आहे,अशी प्रतिक्रिया उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी दिली.(सांकेतिक छायाचित्र)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here