Home पूर्व विदर्भ कोरोनाची भीती दूर करा, नाना पटोले यांचे आवाहन

कोरोनाची भीती दूर करा, नाना पटोले यांचे आवाहन

111

भंडारा : माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत नागरिकांच्या प्रत्यक्ष तपासणीवर भर देण्यात यावा. कोरोना संसर्गजन्य आजार असून नागरिकांच्या मनात कोरोना विषयी भीतीचे वातावरण आहे. कोरोना हा महाभयंकर नसून केवळ आजार आहे. त्यामुळे प्रशासनाने जनजागृतीच्या माध्यमातून लोकांच्या मनातील कोरोनाची भीती दूर करावी, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. लाखनी येथे आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. तहसीलदार मलिक विराणी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन पानतोडे, गटविकास अधिकारी जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी पदमाकर गिदमारे आदी उपस्थित होते.
नागरिक आजार अंगावर काढतात ही बाब योग्य नसून सर्दी, ताप, खोकला, घसा खवखव करणे, तोंडाची चव जाणे अशी लक्षणे आढळताच तत्काळ तपासणी करून घ्यावी. सध्या सण उत्सवाचा काळ असून या कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. सध्यातरी मास्क हेच कोरोनावर औषध असून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन त्यांनी केले.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उत्तम उपाययोजना करणाºया गावांना बक्षीस वा पुरस्कार देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी सूचना विधानसभा अध्यक्षांनी मांडली. सध्या दुर्गा उत्सव सुरू असून या निमित्ताने कोरोन मुक्तीसाठी वेगळे प्रयत्न करणाºया गावांचा यात समावेश करता येईल असे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागासाठी कोरोनाचा अलर्ट असून सतर्कता बाळगावी. मास्कचा वापर, साबणाने नियमित हात धुणे, सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.