मुंबई

राज्यातील अंमलदारांना पोलिस उप निरीक्षकपदी बढती

(Last Updated On: October 20, 2020)

मुंबई : राज्यातील १ हजार ६१ पोलिस अंमलदार यांची पोलिस उप निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
पोलिस महासंचालक कार्यालयाने सुमारे १,०६१ अंमलदारांना उप निरीक्षक या पदावर पदोन्नती देण्याचे आदेश जारी केले. प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने पदोन्नती देण्यात आली आहे. हे सर्व अधिकारी अधिक जबाबदारीने नागरिकांची सेवा करण्यास सज्ज झाले आहेत.
नवीन पदावर अधिक जोमाने कार्यरत राहा तुमच्या सर्वांंकडून अधिक उत्तम कामाची अपेक्षा आहे, अशा शुभेच्छा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदोन्नती झालेल्या पोलिस कर्मचाºयांना दिल्या आहेत.