मुंबई

दहावी-बारावी पुरवणी परीक्षाचे वेळापत्रक घोषित

(Last Updated On: October 20, 2020)

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून यंदाच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर असून, इयत्ता दहावीची परीक्षा 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरदरम्यान होणार आहे़ तसेच, बारावीची परीक्षा 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबरदरम्यान होईल.
दरवर्षी दहावी-बारावीच्या निकालानंतर जुलै-आॅगस्ट महिन्यात पुरवणी परीक्षा घेतली जाते. यंदा मात्र कोरोना विषाणू संसर्गामुळे या परीक्षेबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार की काय अशी भीती निर्माण होती. मात्र, राज्य मंडळाने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यासाठी प्रवेशअर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. दहावी आणि बारावीच्या फेर परीक्षा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये घेतल्या जाणार आहेत. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच दहावी तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे बारावी यांच्या परीक्षा नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये होणार आहेत.