Home राजधानी मुंबई सायबर क्राईम : अपहार करणारा पेटीएम कर्मचारी गजाआड

सायबर क्राईम : अपहार करणारा पेटीएम कर्मचारी गजाआड

71

मुंबई : आॅनलाईन पेटीएम अपहार करणाºया पेटीएम कर्मचाºयास महाराष्ट्र सायबर विभागाने जेरबंद करण्यात आले आहे. यामुळे लहान व्यापारी आणि शेतकºयांचे कष्टाचे पैसे वाचवण्यात यश आले असल्याची माहिती सायबर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी दिली आहे.
या संदर्भात ५ आॅक्टोबर रोजी मुंबईच्या अंधेरी भागातील दुग्ध व्यावसायिक राजेश मनसुख पटेल यांनी यंदाच्या २० आॅगस्ट आणि २० सप्टेंबर रोजी त्यांच्या पेटीएम अकाउंटमधून ५० हजार ४४८ रुपये अज्ञात व्यक्तीने काढून घेतल्याची तक्रार महाराष्ट्र सायबरकडे केली होती. त्यावरून नोडल सायबर ठाणे, महाराष्ट्र सायबर येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पथकाने गुन्ह्याशी संबधित बाबींचा तांत्रिक पद्धतीने तपास करत संशयित आरोपीला तत्काळ अटक केली. आरोपीने इतरही व्यावसायिकांचे पेटीएम अकाऊंटचे पासवर्ड चोरून गैरकामासाठी वापरल्याचे दिसून आले आहे.
लहान व्यावसायिकाचे मर्चंट वॉलेट अकाऊंट उघडून देण्याच्या, तसेच त्यांचा पासवर्ड सेट करून देण्याचे बहाण्याने पासवर्ड स्वत:कडे घेऊन आर्थिक अपहाराकरिता करण्यात असल्याचे समोर आले आहे. संबंधितांनी आपला पासवर्ड स्वत: बदलून तो स्वत: पुरता मर्यादित ठेवावा़ तसेच, त्यात सतत बदल करावा, असे आवाहन केले आहे.