विदर्भ

नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी देण्याचा प्रयत्न

(Last Updated On: October 22, 2020)

अमरावती : परतीचा पाऊस, किडीचा प्रादुर्भावामुळे सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात शेती व शेतपिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. या संकटातून सावरण्यासाठी शासन खंबीरपणे उभे असून नुकसान भरपाई तत्काळ मिळावी, यासाठी पंचनामे सादर करावे, असे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू [bachchu kadu] यांनी दिले.
ही मदत दिवाळीअगोदर मिळण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात नुकसान झालेल्या गावांतील पिकांची प्रत्यक्षपणे पाहणीवेळी ते बोलत होते. परतीच्या पावसामुळे राज्यातील सर्वच भागातील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. या संकटाअगोदरही किडीच्या प्रादुर्भावाने शेतकरीबांधव त्रस्त झाला होता. आता शेतात घाम गाळला तर, निसर्गाने दगा देऊन हाती आलेले पीक गमावले. सोयाबीन काळे पडले असून कापसाचे बोंड खराब झाल्याची चिंता मंत्री कडू यांनी व्यक्त केली.